आणि मी पायऱ्यांवर बसून राहीन तुझ्या शेजारी घरी येई पर्यंत...
आणि नुसताच बसून राहीन तू घरी येई पर्यंत.......
आणि तुला यायला उशीर झाला तर मला काळजी वाटेल आणि तू लवकर आलीस
तर खूप छान....
आणि तुझ्या सोबत तुझ्या पार्ट्यांना येईन ..आणि नाचीन अगदी
मनातले सगडे विचार संपेपर्यंत....
आणि माझा चुकला असेल तर sorry म्हणेल....आणि प्रचंड खुश होईल
जेवा तू मला माफ करून टाकशील...
आणि तुझ्या फोटो कडे बघतोय एक तक आणि मला वाटते कि मी तुला
असा आयुषभर ओळखत राहावा.
आणि तुझ्या फुन्करीचा आवाज माझा कानात ऐकू येतोय, तुझी त्वचा
माझ्या त्वाचावर जाणवते....
आणि मला भीती वाटते जेवा तू राघवतेस, तुझे केस असे डावी कडे
असतात..आणि तुझा चेहरा दुरावलेला..आणि अशावेळीही तू खूप सुंदर दिसतेस...
आणि खर तर मला तुला मांजराचा पिलू घेऊन दयायचा आहे, पण मला जाळायला होईल, जर माझा पेक्षा त्याला जास्त
attention मिळाला तर...
आणि तुला त्रास देणाऱ्या घरातल्या सगळया झुरळना हाकलून लावीन
हा मी....हा.
आणि तुला gifts देईन जे तुला नको असतात..आणि परत घेऊन जाईन
कारण ते तुला नको आहे...
आणि परत तुला विचारीन तू माझाशी लग्न करशील..आणि तू परत नाही
म्हणशील..पण मी परत विचारात राहील..कारण जरी तुला वाटत असेल कि मी मनापासून म्हणत नाही..तरी
शपथ खरच असे वाटत अगदी पहिल्यांदा तुला हे विचारला तेव्हा पासून...
आणि आता सगळ संपत आल आहे..तरी मी रेंगाळतो आहे अजूनही...फक्त
१० मिनिट तू तुझा आयुष्यातून फेकून देण्या अगोदरची आणि मला विसरून जाण्या अगोदरची कि
मी कोण आहे आणि कोण होतो...काही तरी कसातरी करून संवाद साधायचा प्रयत्न करतो आहे...
त्या काही तुटपुंज्या भावना बद्दल न संपणाऱ्या अथांग, उत्स्फूर्त,
कधी कधी जकडून टाकणाऱ्या तर कधी सहील सोडणाऱ्या मला अधिक चांगला माणूस बनवणाऱ्या अविरत,
अशांत, अस्वस्थ, अमर्याद अशा त्या भावना ते प्रेम जे मला तुझाबद्दल वाटत......कायम
कायम.....